मतदान केंद्र परिसरात चपलांचा वापर थांबवता येणार नाही.
परंडा विधानसभा मतदारसंघात गुरुदास कांबळे यांना 'चप्पल' निशाणी मिळाली आहे.
त्यांना हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात चिन्ह बाळगणे, दर्शवणे यावर प्रतिबंध असतो.
नियमाचा प्रोटोकॉल म्हणून, अधिकारी आणि मतदारांनी चपला घालू नये अशी मागणी कांबळे यांनी पत्राद्वारे केली.
त्यांचा या पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पण त्यांची हि मागणी फेटाळण्यात आली आहे.