पंढरपुरात विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आज विठुरायाच्या गाभाऱ्याला सजावट करण्यात आलीये आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आलीये पंढरपूरच्या मंदिरात मोगरा आणि शेवंतीच्या फुलांची सुंदर, मनमोहक आरास केली आहे सजावटीसाठी शेवंती, लाल आणि पिवळी झेंडूची फुलं, गुलाब, मोगरा अशा 1300 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे पुणे येथील कुमार शिंदे यांच्या टीमनं ही फुलासाजवट केली आहे मराठी फाल्गुन महिन्यातील अमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आलीये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावटीसाठी मोगरा आणि शेवंती फुलांचा वापर करण्यात आला आहे मोगरा आणि शेवंतीच्या शुभ्र फुलांनी मंदिर सजलं आहे देवाचा आणि मातेचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी ही सजावट केली आहे विठ्ठल रुक्मिणी यांचे मुख दर्शन करण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत