वसंत ऋतूची चाहूल लागताच केशरी पिवळा पळस बहरतो



पळस बहरला की रंगपंचमीची आठवण येते.



रंगपंचमीमध्ये पळसाच्या रंगाला ग्रामीण भागात आजही महत्त्व आहे.



ग्रामीण भागात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जातो.



वाशीमच्या वनोजा जंगलात दुर्मिळ असलेला पिवळा पळस फुलल्याने निसर्ग प्रेमीमध्ये आनंदाच वातावरण आहे.



अंधश्रद्धेमुळे पिवळा पळस मोठ्या प्रमाणात तोडला गेला आहे



त्यामुळे आता पिवळा पळस दिसणे दुरापास्त झाला होता



त्यामुळे पिवळ्या पळसाची झलक पाहण्यासाठी निसर्ग प्रेमी जंगलाकडे वळताना दिसत आहे