काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज जन्मदिवस.
सोनिया गांधी यांचा जन्म 1946 साली झाला.
मूळच्या इटलीच्या असलेल्या सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्याशी लग्न केलं आणि त्या भारतात आल्या.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या त्या सर्वाधिक काळ अध्यक्षा राहिल्या.
त्यांचे पती आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 7 वर्षांनी 1998 साली सोनिया गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले.
2017 सालापर्यंत 22 वर्षे इतका काळ त्यांनी अध्यक्षपद सांभाळले.
या काळात काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत देखील होतं.
सोनिया गांधी यांचा 2004 ते 2014 या काळात भारतातील सर्वात जास्त शक्तिशाली राजकारणी म्हणून समावेश झाला होता.
2007 मध्ये फोर्ब्जने जगातील तिसरी सर्वात जास्त शक्तिशाली महिला म्हणून त्यांचा उल्लेख केला होता.
संसदीय राजकारणात देखील त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे.