डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन..



महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अभिवादन यांनी अभिवादन केलं.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या स्मृतिस्थळाला राज्यपालांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यत्री यांनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले.



तसेच यावेळी पोलीस दलाच्या वतीने विशेष मानवंदनाही देण्यात आली.



तसेच शांततेचे प्रतिक म्हणून हवेत फुगे सोडण्यात आले.



याप्रसंगी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली.



यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला.