1

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!

2

धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.

3

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.

4

मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

5

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

6

अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो.

7

महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.

8

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

9

महान माणूस एका प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.

10

जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.