दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



धार्मिक भावना भडकविल्याबद्दल केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.



याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



'भारतीय चलनावर गणपती, लक्ष्मीचे फोटो छापा म्हणजे भारताची अर्थव्यवस्था उंचावेल '



असे अंधश्रध्दा पसरविणारे वक्तव्य करून अंधश्रध्देला चालना देण्याचे घाट घातल्याकारणाने केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन



इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने कोंढवा पोलिसांना देण्यात आले आहे



पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. राज्या -राज्यात धार्मिक भा्वना भडकावण्याचा प्रयत्न केल्याबाबत संपूर्ण देशाची माफी मागावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे



कोंढवा पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.



गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे



भाजप, आप आणि काँग्रेस या पक्षानं निवडणुकींची जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे.