दिवाळीचा (Diwali 2022) सण येत्या 21 ऑक्टोबर पासून सुरु होतोय.



दिवाळीचा (Diwali) सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून



आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी साहित्याने बाजारात नवचैतन्य पसरले आहे.



गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठांमध्ये पुणेकरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे



बाजारात विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळतेय. बाजारात विविध सजावटीच्या वस्तू, दिवे, रांगोळी यांच्यासह रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी देखील बाजारपेठा सजल्या आहेत



दिवाळीनिमित्त तुळशीबाग सजली असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत



पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडत असून मुख्य बाजारपेठांमध्ये विविध दिवाळी साहित्य दाखल झाले आहे.



पुण्याच्या तुळशीबागेत तसेच रविवार पेठेत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.



यंदा पाऊसामुळे पुणेकरांच्या खरेदीवर बंधनं आली मात्र तरीही पाऊस नसेल त्यावेळी पुणेकर बाजारामध्ये गर्दी करताना दिसत आहे.



दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आकाशकंदील, पणत्या, कलरफुल रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या लाईट्स आणि दिव्यांच्या माळा सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.