सध्या राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे



राज्यातील विविध जिल्ह्यात हा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे



पुणे जिल्ह्यातही परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे



काल दुपारनंतर पुण्यात झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडवली



दीड ते दोन तास सरु असलेल्या पावसानं सगळीकडं पाणीच पाणी केलं आहे



रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं



दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पावसाच्या पाण्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होते आहे



मुसळधार पावसामुळं पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं



शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे



दीड ते दोन तासाच्या पावसानं सगळीकडे दाणादाण उडाली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरीकांची मात्र चांगलीच धावपळ झाली