शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म 1946 साली झाला.



शत्रुघ्न सिन्हा हे आघाडीचे अभिनेते आणि नेते.



अनेक चित्रपटांत त्यांनी गाजलेल्या भूमिका केल्या.



शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा, त्यांना लव, कुश अन् सोनाक्षी ही तीन मुले आहेत.



शत्रुघ्न सिन्हा भाजपमध्ये असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.



यानंतर त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली अन् काँग्रेसमध्ये प्रवेश केला.



शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 मध्ये पटना साहिबमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती,मात्र तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.



काँग्रेसमध्ये असताना सततच्या पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला.



त्यानंतर आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने जिंकली.



शत्रुघ्न सिन्हा सुमारे दोन लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.