उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. पुरुषांनी उत्तराखंड संघावर विजय मिळवला. तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात 24 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर 17-7 असा दमदार विजय मिळवला. तर महिलांच्या सामन्यात महाराष्ट्राने अरुणाचल प्रदेशचा 18-3 असा एक डाव 15 गुणांनी एकतर्फी विजय मिळवला. 24 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत देशभरातील अव्वल दर्जाचे खो खो खेळाडू उपस्थित आहेत.