विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

पहिल्या टप्पात- नागपूर आणि शिर्डी दरम्यानचे 520 किमी लांब महामार्ग बांधला गेला आहे.

हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हयातून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या शहरी भागातून जातो.

या महामार्गामुळे, इतर 14 जिल्ह्यांशी असलेल्या संपर्क व्यवस्थेतही सुधारण होईल.

तसेच, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला हातभार लागेल.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी ‘गेम चेंजर’ ठरेल.

हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाला, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा वेरूळ लेण्या, शिर्डी, लोणार अशा पर्यटन स्थळांनाही जोडला जाईल.

प्रवाशांसाठी आरामासाठी द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल.

या भागातील उद्योग आणि उत्पादन केंद्राची क्षमता वाढेल.