नगरच्या आगडगावमध्ये एकाच ठिकाणी जावयाचं धोंडे जेवण करण्यात आलं आहे.

देवस्थान समितीच्या बैठकीमध्ये यासंर्भातील प्रस्ताव देण्यात आला होता.

यामध्ये सुरुवातील फक्त आगडगावमधील जावयांचं एकत्रित धोंडे जेवण घालण्याचं ठरवलं होतं.

मात्र या विषयाची चर्चा आजूबाजूच्या खेडेगावामध्ये झाल्याने अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

आपल्या जावयाला देवस्थानच्याच धोंडे जेवणात सहभागी करुन घेण्याची विनंती अनेकांनी देवस्थानच्या समितीला केली.

बघता बघता 600 जावयांची नोंद या धोंडे जेवणासाठी घेण्यात आली.

यामध्ये साडेसात हजार किलोचे पुरण तसेच भात, आमटी आणि धोंडे तयार करण्यात आले होते.

या धोंडे जेवणात सर्व जावयांना आणि लेकींना देवस्थान ट्रस्टच्या वतीने कपडे ,साडी आणि दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले.

या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे