स्वतःचे सुंदर घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.
मात्र बांधकाम साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती आणि आपली आर्थिक कुवत यांची सांगड घालणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही.
त्यामुळे घराचे स्वप्न हे मृगजळ वाटू लागले आहे... मात्र अहमदनगरच्या एका शिक्षकाने लोखंडाऐवजी
बांबू, वीट बांधकामासाठी रॅप ट्रॅप आणि कॅव्हीटी पद्धतीचा वापर करून केवळ स्वस्तात घरच बनवलं
त्याच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन देखील केल आहे
अहमदनगर जिल्ह्यातील हे बांबू हाऊस सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
सतीश गुगळे या शिक्षकांने 2000 चौरस फुटांचे दोन मजली पर्यावरण पूरक घर बनवले आहे..
विशेष म्हणजे हे घर बांधण्यासाठी त्यांनी लोखंडा ऐवजी बांबूचा वापर केला आहे.
त्यामुळे बांधकाम खर्चात 35 ते 40 टक्के बचत झाली असल्याचं गुगळे सांगतात...
मात्र बांबूमुळे हाच खर्च अवघ्या सातशे ते आठशे रुपयांवरती आला आहे.
सुरुवातीला सर्वांनाच हा निव्वळ वेडेपणा वाटलेला मात्र, जवळपास 11 वर्षे झाली हे घर सुस्थितीत आहे.