राज्यातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने



महत्वाचा निकाल दिला असून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत.



त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेले शिर्डी साई मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.



काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांना हार फुले घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता



त्यावेळी साईबाबा मंदिर परिसरात मोठे आंदोलन करण्यात आले होते



राज्यभर हा मुद्दा चर्चेत होता. त्याशिवाय या संदर्भात देखील एक महिन्याच्या कालावधीत याबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते



हा मुद्दा चर्चेत असताना आता शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने धक्कादायक निर्णय दिला आहे



हे विश्वस्त ,मंडळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना देखील खंडपीठाने दिल्या आहेत



त्यामुळे पुन्हा शिर्डी साई बाबा संस्थान मंडळ चर्चेत आले आहे.