अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती डॉ. अशोक चोप्रांसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्राचे सासरे म्हणजेच निक जोनासच्या वडिलांनी मधू यांच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
त्यांनी मधू यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मनात एक गोष्टही सांगितली.
केविन जोनास यांनी आपल्या कमेंटमध्ये लिलिले आहे की, 'लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही त्यांना ओळखू शकलो असतो.
आमच्या आयुष्यात आल्याबद्दल तुमचे आणि प्रियांकाचे धन्यवाद, असेही केविन जोनास यांनी म्हटलं आहे.
केविन जोनास यांच्या कमेंटनंतर प्रियांकानेही कमेंट केली आहे.
तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, 'अमेझिंग पिक्चर.
प्रियांकाच्या चुलत बहिणीनेही या फोटोला 'सुंदर काकू.' अशी कमेंट केली आहे.
प्रियांकानेही आपल्या इंन्स्टाग्रामवरून आई-वडिलांचा फोटो शेअर करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.