आज 1 ऑगस्ट... एलपीजी सिलेंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आज एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये 100 रुपयांची घट करण्यात आलीये. 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्यात. यापूर्वी जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आलेली. तर जुलैमध्ये व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या. आजही घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती मात्र स्थिरच आहेत. 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत सध्या LPG सिलेंडरची किंमत 1103 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1780 रुपये आहे. मुंबईत LPG सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1640.50 रुपयांवर कायम आहे.