भारतात सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. आपल्या अडीअडचणीच्या काळात सोने विकून पैसे उभे केले जातात. जर, तुम्हीदेखील तुमच्याकडील सोन्याचे दागिने विकणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष द्या. सोने विकण्याआधी काही गोष्टी चांगल्या लक्षात असू द्या. सोनं विकण्याआधी दोन-तीन ज्वेलर्सकडून त्यांचे मूल्यांकन करून घ्या. जर तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर चांगली किंमत मिळेल. तुमच्याकडे सोने खरेदी केल्याची पावती असेल तर विक्रीच्या वेळी सोबत बाळगा. सोनं विकताना त्याच्या वजनाकडे ही लक्ष द्या.