जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या लक्झरी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे शेअर्स 10 टक्क्यांनी घटले आहेत.



यामुळे मस्क यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत एका दिवसात 20.3 अब्ज डॉलरची घट झाली आहे



टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचा थेट परिणाम एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर झाला आहे.



यामुळे, ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाने मस्क यांच्या एकूण कमाईमध्ये आतापर्यंतची सातवी मोठी घसरण झाल्याचं सांगितलं आहे.



जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट यांच्यातील संपत्तीतील फरक यामुळे आणखी कमी झाला आहे.



टेस्लाचे शेअर्स घसरल्यानंतरी मस्क यांची संपत्ती अरनॉल्टयांच्या तुलनेत सुमारे 33 अब्ज डॉलर अधिक आहे.



फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट लक्झरी वस्तू कंपनी, LVMH Moët Hennessy चे सीईओ आहेत.



एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती आता 20.3 अब्ज डॉलरने घसरून 234.4 अब्ज डॉलर झाली आहे.



असं असलं तरीही, एलॉन मस्क अजूनही जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत.