आता नेटफ्लिक्स युजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली नेटफ्लिक्स पासवर्ड शेअरिंग आता बंद करण्यात आलं आहे. तुम्ही आता नेटफ्लिक्सचा पासवर्ड मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकणार नाहीत. या वर्षाच्या सुरुवातीला नेटफ्लिक्सने 100 देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग पर्याय बंद केला होता. येत्या सहामाहीत आपला महसूल वाढवण्यासाठी नेटफ्लिक्सने आता भारतातही पासवर्ड शेअरिंगवर बंदी घातली आहे. नेटफ्लिक्सने एका निवेदनात म्हटलं आहे की, जे लोक एकाच घरात राहतात ते एकाच अकाऊंटवर नेटफ्लिक्स वापरू शकतात हे युजर्स ट्रान्सफर प्रोफाइल, मॅनेज ऍक्सेस आणि डिव्हाइसेस या नवीन फीचर्सचा लाभ घेऊ शकतात. जे त्यांच्या ग्राहक त्यांच्या कुटुंबाबाहेर नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर करत आहेत, त्या ग्राहकांना कंपनीने मेल केले आहेत. नेटफ्लिक्सने भारतासह 100 हून जास्त देशांमध्ये पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद केली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मेक्सिको आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. पासवर्ड शेअरिंग बंद केल्यामुळे नेटफ्लिक्सचे जगभरात 60 लाख सबस्क्रायबर्स वाढले आहेत. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग बंद केल्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे. यातून कंपनीने गेल्या सहामाहीत 150 कोटींची कमाई केली आहे.