एलपीजी गॅसच्या सिलेंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट बिघडले आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कधी कमी होतील, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी लोकसभेत याचे उत्तर दिले. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर अधिक आहेत. या दरात घट झाल्यास एलपीजी गॅसचे दर कमी होतील असे पुरी यांनी सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस 750 डॉलर प्रति मॅट्रिक टन इतका दर सुरू आहे. सौदी अरेबियात गॅसच्या दरात 330 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशात LPG ची फार कमी दरवाढ असल्याचे त्यांनी म्हटले. LPG तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. यामुळे एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यास मदत होईल, असेही पुरी यांनी सांगितले