जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट पाहता देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झालेली पाहायला मिळतेय.
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.
काही प्रमाणात ग्राहकांचा कल गोल्ड कॉईन्स खरेदीकडेही पाहायला मिळतोय. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,452 वर आला आहे.
आज एक किलो चांदीचा दर 67,760 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 70 रूपयांची घट झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट गोल्डची किंमत $ 2.06 कमी होऊन $ 1,872.36 प्रति औंसवर आला आहे.
स्पॉट सिल्व्हर प्रति औंस $ 0.09% कमी होऊन चांदीच्या किमती $ 22.19 प्रति औंसवर आहेत.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.