स्ट्रॉबेरी हे एक शक्तिशाली फळ आहे जे आरोग्य मजबूत करू शकते. स्ट्रॉबेरी हे देखील असेच एक फळ आहे. त्याची चव गोड आणि आंबट असते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीने युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे तुम्हाला इन्फेक्शनपासूनही दूर ठेवते. स्ट्रॉबेरीचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून एक कप स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता. हिवाळ्यात हे खाणे जास्त फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉलपासून संरक्षण करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होण्यापासून बचाव होतो.