गुजरातमधील सिंहाची जोडी नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार
गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्या वतीनं सिंहाची नर-मादी जोडी देणार
सिहांच्या या जोडप्याची भर पडल्यानं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान वाढणार
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता.
आता ही परवानगी मिळाल्याने नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली
सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात वाढ देखील झाली
परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केली
त्यामुळे येथील सिंहाची संख्या कमी झाली.
सिंहाची जोडी येणार असल्याने उद्यानात पर्यटकांची संख्या पुन्हा वाढणार आहे.