सकाळच्या वेळी तुम्ही सर्वप्रथम काय खात आहात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर असलेला संतुलित नाश्ता खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
अंडी पोषक तत्वांनी आणि प्रथिन्यांनी भरलेली असतात अंडी खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे चयापचय वाढवतात आणि पोटाची चरबी कमी करतात.
बदाम हे फायबर आणि प्रथिने यांचे चांगलें स्त्रोत आहे रिकाम्यापोटी बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
रिकाम्यापोटी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
बेरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते बेरीचे सेवन शरीरसाठी खूप फायदेशीर असते.
ग्रीक दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
चिया सीड्स हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि फायबरचे चांगले स्रोत आहे. सकाळी चीया सिड्स च्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते.
ओटमीलमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडटस् असतात. सकाळी ओटमील खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते.