जर दांतांवर पिवळेपणा आला असेल तर तुम्ही तुरटीच्या मदतीनं मोत्यासारखे चमकदार दात मिळवू शकता.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Freepik

स्वच्छ आणि चमकदार दात मिळवणं प्रत्येकाची इच्छा असते.

Image Source: Freepik

पांढे शुभ्र, चमकदार दात हे खरंतर सुंदरतेचे आणि उत्तम मौखिक आरोग्याचं प्रतिक आहे.

Image Source: Pexels

पण दातांची स्वच्छता न राखणं आणि इतर काही वाईट सवयींमुळे दात पिवळे राहतात.

Image Source: Freepik

यामुळे केवळ दातांची चमक कमी होत नाही, तर तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या देखील उद्भवते.

Image Source: Freepik

दात स्वच्छ करण्यासाठी फिटकिरीचा वापर करता येतो, चला तर जाणून घेऊया कसा...

Image Source: Freepik

यासाठी चिमूटभर बारीक केलेली तुरटी मिठासोबत घ्या.

Image Source: Freepik

मग हळूहळू या मिश्रणाच्या मदतीनं दातांवर ब्रश करा, मग थोड्या वेळानं चूळ भरा.

Image Source: pexels

तुम्ही हे आठवड्यातून 1-2 वेळा करू शकता

Image Source: freepik

फिटकिरीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.

Image Source: freepik

जे दातांवरची घाण आणि पिवळेपणा साफ करतात आणि दातांचं आरोग्य उत्तम राखतात.

Image Source: freepik

टिप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.