ड्राय स्किनपासून सुटका हवीय?

हिवाळ्यात अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी, ड्राय स्किनपासून सुटका

हिवाळ्यात तुमची त्वचा तजेलदार राहावी असे तुम्हालाही वाटत असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश नक्की करा.

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे या ऋतूत फेसवॉशचा वापर दोनपेक्षा जास्त वेळा करू नये. सौम्य फेसवॉश वापरा.

स्क्रब वापरणं टाळा. यामुळे त्वचा अजून कोरडी होऊ शकते.

टोनर त्वचेची पीएच पातळी नियंत्रणात ठेवते पण त्याच्या जास्त वापरामुळे त्वचा कोरडी होऊ शकते.

कोरड्या त्वचेवर उपायत म्हणून आठवड्यातून फ्कत दोनदाच टोनर लावा.

या ऋतूमध्ये, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी सिरम खूप प्रभावी आहे.

सीरम त्वचेचे पोषण करते. त्यामुळे दररोज सीरमचा वापर करा.

हिवाळ्यात त्वचेचे नुकसान आणि कोरडेपणा टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी मेकअप काढा.

मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चराइजर लावा.

मॉइश्चराइजर लावल्यानंतर ते लगेच झोपू नका. अन्यथा ते त्वचेच्या आतील थरात पोहोचण्याआधीच बिछान्याला लागून पुसून जाईल.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.