मार्गशीर्ष किंवा अगहन महिना 6 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत आहे.

मार्गशीर्ष महिना हा संयम, शुद्धता, सात्विकता आणि ईश्वर भक्तीचा महिना आहे.

या महिन्यात अनेक कामं आणि काही पदार्थ खाणं वर्ज्य मानलं जातं.

मार्गशीर्ष महिन्यात जिरे खाणे देखील वर्ज्य मानलं जातं. याचं कारण नेमकं काय ते जाणून घेऊयात.

मार्गशीर्ष महिन्यात तिखट चवीच्या पदार्थांचं सेवन करु नये.

कारण जिरे उष्ण, पित्तवर्धक आणि इंद्रियांना उत्तेजित करणारे आहे.

म्हणून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात जिऱ्याचं सेवन वर्ज्य आहे.

तसेच, माघ महिन्यात खडीसाखर, फाल्गुन महिन्यात हरभरा खाणं टाळावं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)