रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.
डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.
डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण जास्त असते ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
डाळिंबाचा रस हृदयासाठी फायदेशीर आहे.हे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते.
वजन कमी करण्यासाठी व शरीराला डिटॉक्स ठेवण्यासाठी तुम्ही रोज डाळिंबाचा रस पिऊ शकता.
दररोज डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
डाळिंब हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे एक चांगले स्त्रोत आहे.
डाळिंबात जास्त फायबर असल्याने तुमची पचन शक्ती सुधारते.
डाळिंबाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिन बुस्ट होते.
डाळिंबामुळे शरीरामध्ये लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.