लंचपासून ते डिनरपर्यंत गव्हाच्या पोळ्या महत्त्वाचा भाग आहे.
परंतु या बदलत्या जीवनशैलीत कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे.
हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असणे आवश्यक आहे.
त्यासाठी दैनंदिन आहारात योग्य बदल करणं गरजेचं आहे.
गव्हाची पोळी करताना पीठात बाजरीचे पीठ मिश्रण करावे.
ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.
थंड हवामानात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो.
हिवाळ्यात गहू आणि बाजरीचं मिश्रण फायदेशीर असते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.