भारतात कमी वजन असलेल्या बाळांचा जन्म होण्याचे प्रमाण मोठे आहे. जन्माच्या वेळी मुलाचे वजन सामान्य वजन असावे. कमी वजनाच्या बाळांना अनेक समस्या निर्माण होतात. सामान्यपणे वेळेवर जन्मलेल्या बाळाचे वजन जन्माच्या वेळी 2.5 किलोपेक्षा अधिक असायला हवे. जी मुलं दहाव्या महिन्यात जन्माला येतात त्यांचे वजन 3 ते 4 किलोपर्यंत देखील वाढलेले असते. त्याच्या उलट जी मुले वेळेआधीच जन्माला येतात. म्हणजेच सातव्या किंवा आठव्या महिन्यात जन्माला येतात त्या बाळांचे वजन सामान्य वजनापेक्षा कमी असते. तरीही जन्मावेळी बाळाचे वजन 2.5 ते 3 किलो असेल तर ते योग्य मानले जाते. 1.5 किलोहून कमी वजनाच्या बाळाला लो बर्थ वेट बेबी म्हटले जाते. जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असणे योग्य मानले जात नाही.