गोकर्ण म्हणजेच अपराजिता पांढऱ्या आणि निळ्या फुलांची असते. निळ्या फुलांची अपराजिता सुद्धा दोन प्रकारची असते. सिंगल फ्लॉवर आणि डबल फ्लॉवर. निळी अपराजिता सहज उपलब्ध असते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त. वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. हे बुद्धी किंवा मन आणि स्मरणशक्ती वाढवते असे मानले जाते. बुद्धिमत्ता वाढवते, घसा शुद्ध करते, डोळ्यांसाठी उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार त्वचारोग आणि कुष्ठरोग यांसारख्या त्वचारोगात ते फायदेशीर आहे. (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)