वाढत्या वयानुसार महिलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यात अनेक बदल होत जातात. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना तुम्ही पोटऱ्या ताणण्याचा व्यायाम करू शकता. यासाठी टाच उचला आणि पाचही बोटांवर भार टाकून उभे राहा. यामुळे पायांचे स्नायू सक्रिय राहतात आणि दुखण्यापासून आराम मिळतो. कामादरम्यान कोणाशी फोनवर बोलत असाल तर वज्रासनात बसून बोला. यामुळे पचनसंस्थेला आधार मिळतो आणि जेवन चांगले पचते. जर तुम्हाला कपाटातून काही मिळत नसेल तर या काळात 4 ते 5 वेळा स्क्वॅट्स करा. यामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही काही भाज्या कापत असाल किंवा सोलत असाल तर सुखासनाच्या आसनात बसल्याने शांती मिळते आणि पचन सुधारते. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )