भारतात रेल्वेचं जाळं देशभरात पसरलेलं आहे. देशात आठ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. भारतीय रेल्वे कोट्यवधी जनसामान्यांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी भारतीय रेल्वेचा चौथा क्रमांक लागतो. आपण रेल्वे स्टेशन हा शब्द बोलतो, ऐकतो आणि वाचतोही, पण त्याला हिंदीत काय म्हणतात ते आपल्याला माहित नाही. रेल्वे स्टेशनला हिंदीत ‘लौह पथ गामिनी विराम बिंदू’ किंवा ‘लौह पथ गामिनी विश्राम स्थल’ असं म्हणतात. रेल्वे स्टेशनला 'रेलगाडी पडाव स्थल' असेही म्हणतात. भारतात प्रत्येक शहर एकमेकांना रेल्वेने जोडले गेले आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचण्याचा हा एक मुख्य स्रोत आहे. आपण प्रामुख्याने बोलताना रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशन हा शब्द वापरतो.