विवाहित महिलांचा सण वट सावित्री... ज्याची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा हा सण 21 जून रोजी साजरा होणार आहे. या व्रताचे नियम आणि आहाराविषयी माहिती जाणून घ्या.. सकाळी लवकर स्नान करून वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा घालावी. महिलांनी पूजेपूर्वी आणि दरम्यान काहीही सेवन करू नये. पूजा आणि परिक्रमा करून उपवास सोडवा. हरभरा, सुका मेवा, मिठाई आणि भोग म्हणून दिलेली फळे खावीत. उपवास करणाऱ्या महिलांनी उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नये. या दिवशी घरात अंडी, मांस, मासे पदार्थ शिजवू नयेत. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )