हिवाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी जम्मू आणि काश्मीरचा पर्याय निवडतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

दरवर्षी मोठ्या संख्येने येथे पर्यटक पोहोचतात आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतात.

Image Source: pinterest

यंदा तुम्हीही फॅमिली ट्रीपसाठी जम्मू आणि काश्मीरला जायच्या विचारात असाल, तर या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या.

Image Source: pinterest

गुलमर्ग

काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टीची मजा घेता येईल, येथे बर्फाची दाट चादर परसते. यावेळी स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि स्नो स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी दूर-दूरवरून पर्यटक येथे येतात.

Image Source: pinterest

सोनमर्ग

सोनमर्गमध्ये तुम्ही बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात सोनमर्ग हे ठिकाण बर्फाने झाकलेले असते. येथे तुम्ही ट्रेकिंग, स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.

Image Source: pinterest

पहलगाम

हिवाळ्यात पहलगाम खूप सुंदर दिसते. दूरदूरवरून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

Image Source: pinterest

पटनीटॉप

पटनीटॉप हे शिवखोडी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. हिवाळ्यात इथे बर्फवृष्टीचा आनंद लुटता येतो.

Image Source: pinterest

श्रीनगर

तुम्ही हिवाळ्यात श्रीनगरमध्येही कुटुंबासोबत सहलीचा आनंद घेऊ शकता. तुम्ही येथे शिकारा सायकलही चालवू शकता.

Image Source: pinterest