रेड वेल्वेट केक बनवण्यासाठी काय-काय लागणार?
रेड व्हेल्वेट केक बनवण्यासाठी मैदा, कॅस्टर शुगर, बटर, अंडी, कोको पावडर, व्हिनेगर, बेकिंग सोडा, दही, रेड फूड कलर, व्हेनिला इसेन्स इत्यादी साहित्य लागणार आहे.
एका मोठ्या बाऊलमध्ये पिठी साखर आणि बटर चांगलं फेटून एकत्र करा. मिश्रण पातळ होईपर्यंत फेटा.
या तयार मिश्रणात मैदा, कोको पावडर, आणि फेटलेलं दही एकत्र करा.
मिश्रणात रेड फूड कलर आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घालून एकत्र करा.
तयार मिश्रण केक टीनमध्ये टाका आणि प्रीहिटेड ओव्हनमध्ये 180 अंश सेल्सिअसवर 30 ते 40 मिनिटांसाठी बेक करा. केक व्यवस्थित भाजला गेला आहे का? हे पाहण्यासाठी टूथपिक वापरा.
केक थंड झाल्यावर तुमच्या आवडच्या ख्रिसमस थीम असलेल्या चॉकलेट्सनी किंवा क्रीम चीज आयसिंगनं डेकोरेट करा.
रेड व्हेलवेट केक सजवण्यासाठी क्रीम चीज आयसिंग उत्तम ऑप्शन आहे.
यामुळे केकला अधिक चवदार आणि आकर्षक लूक मिळतो.