महाराष्ट्र हे देशाच्या पर्यटनाची राजधानी आहे. ताडोबाची सफर हा रोमांकच अनुभव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. पुणे ऐतिहासिक शहर म्हणून ही ओळखले जाते. सिंहगड, शनिवार वाडा, दगडू शेठ गणपती अशी अनेक पर्यटन स्थळ येथे आहेत. औरंगाबाद अर्थात संभाजीनगर लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अजिंठा व एलोरा गुंफा, पाणचक्की, बीबी का मकबरा ही ठिकाणे प्रमुख आकर्षण आहे. कोकण किनरपट्टीवर वसलेला रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील मोठा टूरीस्ट पॉईंट आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी अनेकांचे श्रद्धास्थान आहे. रंकाळा तलावामुळे कोल्हापुर चांगलाच प्रसिद्ध आहे. साताऱ्या जिल्ह्यातील कास पठार हे देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. नाशिक हे महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून ओखळले जाते. अनेक त्र्यंबकेश्वर, पंचवटी यासह अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील मिनि काश्मिर म्हणून ओखळले जाते. देशभरातील पर्यटक महाबळेश्वरमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्टयन स्थळ आहे. सर्वात छोटं हिल स्टेशन आहे.