दही हे प्रोबायोटिक अन्न आहे, त्यामुळे दह्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

त्याच बरोबर दही नीट खाल्ले नाही तर त्याचे फायदे शरीराला मिळत नाहीत.

Image Source: pexels

दह्यासोबत अनेकदा साखर किंवा मीठ सेवन केले जाते.

Image Source: pexels

दह्यात साखर घालून खाल्ल्यास दह्याचा आंबटपणा कमी होतो, अशा स्थितीत दही खाणे सोपे जाते.

Image Source: pexels

ज्या लोकांना झटपट एनर्जी लागते ते दही साखर मिसळून खाऊ शकतात. पण दह्यामध्ये साखर घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढते.

Image Source: pexels

रोज साखर मिसळून दही खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexels

दह्यात मीठ घातल्याने त्याची चव वाढते.

Image Source: pexels

जे लोक जास्त तीव्रतेचे वर्कआउट करतात त्यांच्या घामाने इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, म्हणून त्यांनी मीठ मिसळून दही खावे.

Image Source: pexels

पण जास्त प्रमाणात मीठ मिसळून दही खाल्ल्याने बीपी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

Image Source: pexels

निरोगी राहायचे असेल तर दही साधे खावे. मीठ आणि साखर मिसळून दही खाल्ल्याने चव बदलते पण ते आपल्या आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसते.

Image Source: pexels