आजकाल आपण सोशल मीडियावर असे अनेक रील्स पाहतो, ज्यामध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात.
ज्याप्रमाणे सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे रात्रीचे जेवणही खूप महत्त्वाचे असते.
बरेच लोक वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण वगळतात.
परंतु रात्रीचे जेवण वगळणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
रात्रीचे जेवण न केल्याने पचनाच्या समस्या सुरू होऊ शकतात.
कमी प्रमाणात अन्न खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
रात्रीचे जेवण वगळल्यास सकाळी जास्त भूक लागते त्यामुळे वजनात वाढ होते.
रिकाम्या पोटी झोपल्याने झोपेचे चक्र आणि झोपेची गुणवत्ता प्रभावित होते, ज्यामुळे मानसिक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
रात्रीचे जेवण वगळल्याने चयापचय मंदावतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि ऊर्जा कमी होते.
याचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याने , दीर्घकाळ चिंता, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.