पावसाळा सुरू झाला की खेकडे खाण्याची मजा काही वेगळीच असते. याच काळात त्यांचा स्वाद घेतल्याने आरोग्य फायदेही दुप्पट होतात.
खेकड्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण इतर मांसाहाराइतकंच असतं, पण तो संतृप्त चरबीपासून मुक्त असतो. त्यामुळे हा एक आरोग्यदायी आणि हलकाफुलका पर्याय ठरतो.
खेकडे खाल्ल्याने शरीरातील चयापचय दर वाढतो आणि दिवसभर उत्साही राहायला मदत होते. त्यामुळे तो आहारात सामील करणं फायदेशीर ठरतं.
खेकड्यामध्ये नैसर्गिक ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे हृदयासाठी लाभदायक असते. हे फॅटी अॅसिड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
खेकडे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यामुळे ते हृदयासाठी रक्षक ठरतात.
सेलेनियम, व्हिटॅमिन बी२ आणि कॉपरसारखी पोषकद्रव्ये खेकड्यांमध्ये मुबलक प्रमाणात असतात. ही जीवनसत्त्वे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक आहेत.
खेकड्यातील पोषक घटक मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. वयानुसार होणाऱ्या विस्मरणाचा धोका कमी करण्यासही हे सहाय्यक ठरतात.
खेकड्यामध्ये असलेल्या खनिजांमुळे हाडं मजबूत राहतात. हाडांच्या आरोग्यासाठी नियमित खेकडे खाणे फायदेशीर ठरते.
खेकड्यांतील अन्नघटक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे सर्दी-खोकला किंवा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
खेकडा हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी सीफूड पर्याय आहे. उत्तम आरोग्य राखण्यासाठी पावसाळ्यात खेकड्याचा आहारात जरूर समावेश करा.