मराठी महिन्याप्रमाणे श्रावण महिना म्हणजे सणासमारंभाला सुरुवात.
महिलांना नटण्यासाठीची उत्तम संधी या काळात मिळते.
चेहरा सणासमारंभात टवटवीत दिसण्यासाठी काही गोष्टीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
चेहरा दिवसातून दोनदा स्वच्छ पाण्याने धुवावे.
चेहरा मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझ साठी तुम्ही विविध बाहेरील उत्पादने किंवा घरगुती उत्पादनांचा वापर करू शकता.
मॉइश्चरयझ करताना चेहरा ला मसाज करणे आवश्यक आहे.
शरीर असो किंवा त्वचा योग्य काळजी घेण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.
नैसर्गिकरीत्या चेहरा तजेलदार होण्यासाठी व्यायामासोबत दिवसभर भरपूर पाणी पिणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
शरीराला उत्तम आहाराची गरज भासते. सध्याच्या जीवनशैलीत आहाराकडे मनुष्य दुर्लक्ष करतो.
परंतु असे करणे शरीरासाठी हानिकारक आहे.
चेहरा तेजस्वी बनविण्यासाठी उत्तम आणि सात्विक आहार घेणे अत्यावश्यक आहे.
घराबाहेर पडताना किंवा इतरत्र कोठेही जाताना महिलांनी चेहऱ्यावर अतिशय कमी मेकअप करावा.
मेकअप साठी वापरले जाणाऱ्या विविध उत्पादनाच्या वापरामुळे चेहऱ्यावर ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )