आजकाल सुगंधी तांदळाला लोक पसंती देतात. पण कुठला तांदूळ सुगंधी आणि चविष्ट याचं गणित कुठेतरी हुकतं आणि मग भेसळयुक्त तांदूळ गळ्यात पडतो. स्वयंपाकघरातून भात शिजताना येणारा घमघमाटानं अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आजकाल भाताला सुंगध आणि चवही नसल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात. कोणत्याही भाताला येणारा सुगंध आणि त्याची चव ही त्या भागातील हवामानावर आणि मातीवर अवलंबून असते. सामान्यपणे भाताला येणारा सुगंध हा थंड वातावरणामुळे येतो. जर भात थंड वातावरणात पिकवलेला असेल तरच त्याला वास येतो. पण तोच तांदूळ समुद्रसपाटीच्या प्रदेशात पिकवला तर त्याला वास येत नाही. भाताला सुगंध देणारा जीन हा थंड हवामान असणाऱ्या भागात अधिक असतो. हा जीन 35 अंश तापमान असणाऱ्या ठिकाणी संपून जातो. डोंगरामध्ये थंड वातावरण असल्यानं तिथे हा जीन असतो.