डिटॉक्स होण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स जास्तप्रमाणात फोन वापरणाऱ्या व्यक्तीला सतत स्क्रिन पाहून दृष्टी कमी होण्याची समस्या निर्माण होते. अनेकांना हातात थोड्यावेळ फोन नसला की अस्वस्थ वाटते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत हातात फोन असतोच. हळुहळु झोपेच्या समस्या, वजन वाढणं, मान आणि डोकं दुखणं अशा कितीतरी कुरबुरी वाढू लागतात. आपण फोन केव्हा आणि कधी तसेच किती वेळासाठी वापरायचा याची वेळ ठरवून घ्या. हळू हळू करून फोन दूर ठेवल्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. वेळो-वेळी तुम्ही स्वत: फोनपासून दूर राहा. आपल्या फोनमध्ये असणारे फोकस मोड ऑन करून आपल्याला ज्यात अधिक वेळ जातो असे ॲप बंद करता येतात.