जेवण झालं की अनेकजण पानाचा विड्याचं पान आवर्जून खातात. नागवेलीची ही पानं पचनासाठी अत्यंत आवश्यक असून सर्दी खोकल्यासह अनेक आजार पळतात. तोंडाची चव वाढवण्यासह अनेक जीवाणूंचा प्रभावी सामना करण्यासाठी विड्याचं पान अत्यंत फायद्याचं आहे. आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती म्हणून विड्याच्या पानाची ओळख आहे. तहान शमवण्यासाठी तसेच मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यासाठी विड्यांच्या पानांचा उपयोग होतो. आवाज बसला असेल किंवा खोकल्यानं गळा कोरडा पडला असेल तर विड्याचं साधं पान खाण्याचा सल्ला देण्यात येतो. विड्याच्या पानासोबत मधाचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्याह अनेक समस्या दूर होतात. काही दुखापत झाल्यास सुपारीच्या पानांचे सेवनाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. यात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स सारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्याला अनेक प्रकारे लाभ देतात. बहुतेक लोक विड्याच्या पानात सुपारी, तंबाखू, चुना इत्यादी मिसळून सेवन करतात. बहुतेक लोक विड्याच्या पानात सुपारी, तंबाखू, चुना इत्यादी मिसळून सेवन करतात.