Railway Rule : कन्फर्म तात्काळ तिकीट कॅन्सल केल्यासही मिळेल परतावा मिळू शकतो, यासाठी रेल्वेचा नियम काय आहे, जाणून घ्या.
रेल्वे नियमांनुसार सामान्य परिस्थितीत तत्काळ तिकीट किंवा डुप्लिकेट तत्काळ तिकीट रद्द केल्यावर कोणताही परतावा दिला जात नाही.
पण काही विशिष्ट परिस्थितीत, एकदा तिकिट बुक केल्यानंतर तिकीटाची संपूर्ण रक्कम परत केली जाते.
जर प्रवाशाच्या प्रवासाच्या बोर्डिंग पाँईटवर पोहोचायला ट्रेनला तीन तासांपेक्षा जास्त उशीर होत असेल आणि ट्रेन बोर्डिंग पॉईंटवर नसेल, तर तुम्हाला रिफंड मिळू शकतो.
जर प्रवाशाचा प्रवास सुरू होणारा बिंदू आणि बोर्डिंग पॉईंट वेगळं असतील, तर तिकीटाचे पैसे परत मिळू शकतात.
जर ट्रेन वळवलेल्या मार्गावर चालवली जात असेल आणि प्रवासी पर्यायी मार्गाने प्रवास करण्यास तयार नसेल, तर कन्फर्म तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतरही तुम्हाला रिफंड मिळू शकतो.
तत्काळ सुविधेसाठी निश्चित केलेला डबा जोडला नसल्यास आणि प्रवाशाला त्याच श्रेणीतील सुविधा न दिल्यास, तिकीटाचे पैसे परत मिळू शकतात.
जरी प्रवाशाने बुक केलेल्या श्रेणीच्या खालच्या श्रेणीत प्रवासाची सोय केली गेली असेल आणि यात्री प्रवास करण्यास इच्छित नसेल तरीही त्याला परतावा मिळू शकतो.
प्रवाशाने खालच्या श्रेणीत प्रवास केल्यास, भाड्यातील तफावत आणि तत्काळ शुल्कातील फरक असेल तर, ती रक्कम प्रवाशाला परत केली जाईल.