जीन्सला छोटा खिसा चिल्लर ठेवण्यासाठी नाही, तर मग कशासाठी असतो? वाचा खरं कारण कपड्यांच्या फॅशनचे नवनवीन ट्रेंड येत राहतात, पण जीन्स पँटचा ट्रेंड कधीही जात नाही. मुलं असो किंवा मुली जीन्स पँट घालणं सगळेच पसंत करतात. 19 च्या दशकात सुरु झालेल्या जीन्सची फॅशन एव्हरग्रीन बवली आहे. जीन्स फॅशनचा ट्रेंड तिळमात्रही कमी झालेला नाही. जीन्सच्या वेगवेगळ्या स्टाईल पाहायला मिळतात, पण उजव्या बाजूला छोटा खिसा कॉमन असतो. प्रत्येक जीन्सच्या उजव्या बाजूला छोटा खिसा पाहायला मिळतो. अनेक जण या छोट्या खिशाचा वापर पैशाची नाणी ठेवण्यासाठी करतात. पण, यासाठी हा खिसा तयार करण्यात आलेला नाही. जीन्सचा शोध कामगारांसाठी करण्यात आला होता, कारण खाणकाम करणाऱ्या मजुरांचे कपडे खराब होऊन लवकर फाटायचे. जेव्हा जीन्सचा शोध लागला तेव्हा आताच्या काळाप्रमाणे मनगटावर बांधण्यासारंखी घड्याळं नव्हती, तर घड्याळाचं छोटी डब्बी असायची, ज्याला साखळी असायची. जीन्सच्या पुढच्या किंवा मागच्या खिशात घड्याळ ठेवल्यावर डायल तुटण्याची शक्यता असायची. त्यामुळे, हे घड्याळाचं छोटं घड्याळ ठेवण्यासाठी जीन्समध्ये छोटा खिसा बनवण्यात आला होता. पण, हळूहळू घड्याळाची जागा मनगटावर आली आणि छोट्याशा खिशात इतर वस्तू ठेवल्या जाऊ लागल्या. आता जीन्समधील हा छोटासा खिसा फॅशन बनला आहे. या छोट्या खिशाचा वापर लोक चिल्लर, पेन ड्राईव्ह आणि इतर छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी करतात.