मूळव्याध, पाईल्स, फिशर ही एक वैद्यकीय स्थिती आहे.
प्रोसेस्ड फूडमध्ये फायबरचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला मूळव्याध झाला असेल तर या पदार्थांपासून दूरच राहा.
चवीला चमचमीत लागणारा पास्ता हा देखील मैद्यापासून बनवला जातो त्यामुळे मैद्याचे पदार्थ खाणे टाळा.
दूध, चीज आणि इतर जड मलाईचे पदार्थ टाळावेत.
तळलेले पदार्थ मुळात पचण्यास कठीण असतात त्यामुळे उत्सर्जन करताना त्रास होऊ शकतो.
फायबरचे प्रमाण कमी नाही तर मसालेदार पदार्थ देखील मूळव्याध असलेल्या लोकांना मलविसर्जन करताना वेदना आणि अस्वस्थतेशी संबंधित असू शकतात.
अल्कोहोल तुम्हाला डिहायड्रेट करतं. मूळव्याध असलेल्या लोकांसाठी हा चांगला पर्याय नाही.
चहा, कॉफी यामध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उत्सर्जन करताना त्रास होऊ शकतो.
फायबरच्या कमतरतेमुळे ज्यांना लक्षणे दिसत आहेत किंवा मूळव्याध आहेत अशा लोकांनी ते टाळावे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )