वाढलेल्या वजनानं हैराण असलेल्यांना अनेकदा जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो
पण, खरंच जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं पोटावरची चरबी बर्फासारखी वितळते?
खरंच, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं का?
तर, याचं उत्तर आहे हो... वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी गुणकारी ठरतं.
पोटाची वाढलेली चरबी, शरीरातील फॅट्स, अपचनाच्या समस्या यांसारख्या अनेक समस्यांवर जिरं गुणकारी ठरतं.
जर तुमच्याही पोटाचा घेर वाढला असेल आणि कमी करायचा असेल, तर जिऱ्याचं पाणी प्या आणि फरक पाहा.
जिऱ्याचं पाणी तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
आपली पचनक्रिया व्यवस्थित असेल, तर शरीराच्या अर्ध्याहून अधिक समस्या दूर होतात, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
जिऱ्याचं पाणी पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत करतं. अपचन झाल्यामुळे अनेकदा पोट फुगणं, पित्त यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
जिऱ्याचं पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं.
जिऱ्याचं पाणी डिटॉक्सिफिकेशनसाठीही गुणकारी ठरतं.
जिऱ्याच्या पाण्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.
काही लोकांचा असा विश्वास आहे की, डिटॉक्सिफिकेशन वजन कमी करण्यात मदत करतं.
त्यामुळे डिटॉक्स करण्यासाठीही जिऱ्याचं पाणी वापरतात...
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)