वर्कआऊट केल्यानंतर बऱ्याचदा स्नायू दुखतात, अंग गळून पडतं.
वर्कआऊटनंतर अंगदुखीपासून आराम हवा असेल तर, काही टिप्स तुम्हाला आम्ही सांगतो.
जर तुम्ही वर्कआऊटपूर्वी वॉर्मअप केलं नाहीतर, तुमचं अंग दुखणारच.
त्यामुळे वर्कआऊट करण्यापूर्वी वॉर्मअप करा.
वर्कआऊटनंतर जर अंग दुखत असेल तर तेलानं मालिश करा, त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.
वर्कआऊटनंतरची अंगदुखी टाळायची असेल तर, वर्कआऊटपूर्वी गरम पाण्यानं आंघोळ करा.
वर्कआऊटनंतरच्या अंगदुखीसाठी रोजमेरी तेलाचा वापर करा, फरक जाणवेल.
वर्कआऊटनंतरची अंगदुखी दूर करण्यासाठी स्ट्रेचिंग करा.
तरीही तुमचं अंग दुखत असेल तर, बर्फानं शेक द्या.
झोप शरीरासाठी खूप महत्वाची आहे शरीराला आराम मिळतो. त्यामुळे अंगदुखी कमी करण्यासाठी पुरेशी प घ्या.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.